इंदापुरात द्राक्ष, गहू उत्पादक धास्तावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात द्राक्ष, गहू उत्पादक धास्तावले
इंदापुरात द्राक्ष, गहू उत्पादक धास्तावले

इंदापुरात द्राक्ष, गहू उत्पादक धास्तावले

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. ७ : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे द्राक्ष तसेच गहू उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. ढगाळ वातावरण आज सकाळपासून होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जंक्शन, लासुर्णे व अंथुर्णे परिसरामध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू आहे. जोराचा अवकाळी पाऊस झाल्यास मण्यामध्ये पाणी साचून द्राक्षाचे घड क्रॅकिंग होण्याची शक्यता आहे तसेच अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा मोठा फटका बसण्याच्या भीतीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांचा गहू काढणीला आला असून अवकाळी पावसाचा फटका गव्हाला बसण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने चार-पाच दिवसापूर्वीच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे अनेक गहू उत्पादक शेतकऱ्यांनी मशिनच्या साहाय्याने गव्हाची काढणी करण्याची सुरुवात केली होती. सध्या शेतकऱ्यांची कामाची धांदल उडाली असून शेतीतील पिके काढण्याच्या कामांना वेग आला आहे.

सध्या द्राक्ष बागेतील द्राक्षे तयार झाली आहेत. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. आमच्या परिसरामध्ये पाऊस पडला नाही. मात्र अवकाळी पाऊस येण्याच्या भीतीमुळे झोप उडाली आहे.
- मल्हारी शिंदे, प्रगतशील, बोरी

03019