इंदापुरात गव्हाच्या काढणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात गव्हाच्या काढणीला वेग
इंदापुरात गव्हाच्या काढणीला वेग

इंदापुरात गव्हाच्या काढणीला वेग

sakal_logo
By

वालचंदनगर : पावसाच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी गहू, हरभराच्या काढणीच्या कामांना वेग आला आहे. इंदापूर तालुक्याच्‍या पश्‍चिम भागामध्ये गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. मंगळवारी (ता.७) निमसाखर, लासुर्णे, जंक्शन, अंथुर्णे परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पावसामुळे शेतकरी धास्तावला असून गहू, हरभरा काढण्याच्या कामांना वेग आला आहे. मजुराच्या साहाय्याने गहू काढणी करण्याऐवजी मशिनच्या साह्याने गव्हाची काढणीची कामे वेगात सुरू आहे. अवकाळी पावसापूर्वी सुमारे १६०० ते २००० रुपये प्रतिएकर गव्हाच्या काढणणीचा दर होता. पावसामुळे मशिनचा दर वाढवला असून एकरी २००० हजार ते २५०० रुपये दराची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये सुमारे साडेपाच हजार हेक्टर गव्हाचे व साडेतीन हजार हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र असून सध्या सुमारे ५० टक्के काढणी पूर्ण झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी दिली.
----
03026