कळंबमध्ये रंगणार उद्या कुस्त्यांचा थरार

कळंबमध्ये रंगणार उद्या कुस्त्यांचा थरार

वालचंदनगर, ता.३ : कळंब (ता.इंदापूर) येथे शुक्रवारी (ता.५) लालमातीमध्ये आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पहिलवानांच्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले आहे. महिलांच्याही मॅटवरील कुस्त्या रंगणार असल्याची माहिती फडतरे उद्योग समुहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली.
कै.बाबासाहेब फडतरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त फडतरे नॉलेज सिटीच्या प्रांगणामध्ये लाल मातीमधील कुस्ती स्पर्धा होणार आहेत. यामध्ये इराणमधील आंतरराष्ट्रीय पहिलवानापासून पंजाब, हरिणाया, कोल्हापूरमधील नामांकित पहिलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा भारत केसरी सिंकदर शेख व हरियाणाचा मनजितसिंग खत्री यांच्यामध्ये रंगणार आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती सराटी गावातील पहिलवान माऊली कोकाटे व पंजाबचा पहिलवान सतेंन्द्र यांच्या होणार आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व कोल्हापूरचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यामध्ये रंगणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती इराणाचा मेहर इराणी व भारत केसरी माऊली जमदाडे यांच्यामध्ये होणार आहे. याव्यतिरिक्त महारुद्र काळेल (कुर्डुवाडी) विरुद्ध संदीप मोटे (सांगली), राघू ठोंबरे (कोल्हापूर) विरुद्ध राहुल डबस (पंजाब),दादा मुलाणी विरुद्ध संतोष जगताप तसेच मनीष रायते विरुद्ध भैरू माने यांच्या मध्ये होणार आहेत.

प्रतीक्षा बागडे हिला जीवनगौरव पुरस्कार
पहिली महाराष्ट्र केसरी पहिलवान प्रतिक्षा बागडे तसेच सोन्याची गदा व शिवराय केसरी किताब पटकाविणाऱ्या पहिलवान महेंद्र गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार देवून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस फडतरे उद्योग समुहाच्या वतीने देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com