इंदापूरचे विकासपुरुष

इंदापूरचे विकासपुरुष

शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या दत्तात्रेय भरणे मामांचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते राज्याच्या सात खात्यांचे राज्यमंत्री व सोलापूरच्या पालकमंत्रीपदापर्यंत केलेला राजकीय प्रवास आजच्या तरुणपिढी निश्‍चित प्रेरणादायी आहे.
-राजकुमार थोरात, वालचंदनगर


गतिमान नेतृत्व
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भरणेमामांनी स्वत:ला झोकून दिले आहे. इतिहासामध्ये भगीरथाने तपस्या करून पृथ्वीवरती गंगा आणल्याची कथा सांगितली जाते. तशी भरणे मामांनी झेडपी अध्यक्ष ते राज्यमंत्री या कालावधीमध्ये ११ वर्षामध्ये इंदापूरच्या विकासासाठी ५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासनिधीची गंगा आणली आहे. सत्ता असो की, नसो मामा तालुक्यासाठी निधी कमी पडून देत नसून तालुक्याचे आत्तापर्यंतचे सर्वात गतिमान नेतृत्व म्हणून माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे नाव इतिहासामध्ये निश्‍चितच सुवर्णअक्षराने लिहिले जाईल यात तिळमात्र ही शंका नाही.

संधीचे केले सोने
राज्याचे कार्यक्षम माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कुटुंबाला कोणताही राजकीय वारसा नसताना देखील राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३० वर्षापूर्वी १९९२मध्ये भरणे मामांना श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदावरती काम करण्याची संधी दिली. नंतरच्या काळामध्ये श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्षही केले. भरणे मामांनी संधीचे सोने केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा बहुमान...
२००९च्या विधानसभेच्या पराभवानंतर भरणे मामांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सन २०१२च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे करून थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. मामांनी तालुक्यातील विकासकामांची गती वाढली. दलितवस्ती सुधार योजनेतील कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणला. मामांनी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी तालुक्यामध्ये आणून तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. याव्यतिरिक्त वैयक्तिक लाभांच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवल्या. याचा फायदा २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झाला.

आमदार होण्याचा बहुमान...
शेतकऱ्याचा मुलगा झेडपी अध्यक्ष झाल्यामुळे सर्वसामान्यांची नस ओळखून तालुक्याचा केलेला विकास जनतेला भावला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने भरणे मामांच्या अडीच वर्षाच्या कामांचे मूल्यमापन करून त्यांना तालुक्यातून थेट विधानभवनामध्ये पाठविले. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता नसल्यामुळे भरणे मामा विरोधी पक्षाचे आमदार झाले. विरोधी पक्षाला ही मामांनी भुरळ पाडली. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री यांनी पाच वर्षात भरणे मामांमुळे तालुक्याला भरभरून निधी दिला. २०१४- २०१९च्या पंचवार्षिकमध्ये मामांनी जिल्ह्यात सर्वाधिक १४५०कोटी रुपयांचा विकासनिधी आणून तालुक्याच्या विकासाची घौडदौड सुरुच ठेवली.

दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान
झेडपीचे अध्यक्ष व नंतर २०१४ चे आमदार असताना जनतेने आमदार भरणेमामांची तालुक्याच्या विकासासाठी सुरु असलेली धडपड पाहिली होती. विकास कधीच थांबत नाही. तालुक्यातील अनेक विकासकांचा अनुशेष भरून काढण्यासाठी २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने दुसऱ्यांदा भरणे मामांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालत तालुक्याच्या विकासाची पुन्हा संधी दिली.

पवार कुटुंबाने मंत्रिपदाची दिली संधी
सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती व पक्षामध्ये सुरु असलेले मतभेदाच्या राजकारणाची जनतेला किळस आली आहे. मात्र, पक्षनिष्ठा
आयुष्यातील प्रामाणिकपणा कसा असावा हे शिकायचे असेल तर निश्‍चित इंदापूरला यावे लागेल. २०१४-१९ या कालावधीमध्ये
आमदार असताना भरणे मामांना तत्कालीन सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी दिलेली पक्षप्रवेशाची ऑफर थेटच नाकारली होती. याचा फायदा मामांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर झाला. राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडी सरकार आले. सरकारमध्ये मामांना एक-दोन नव्हे तर तब्बल सात खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची व सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली. हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या विश्‍वास, पक्षनिष्ठेमुळे शक्य झाले.

रस्तेमंत्री दत्तामामा
तालुक्याच्या विकासासाठी दळणवळण महत्त्वाचे आहे. रस्ते हे रक्तवाहिन्यांप्रमाणे काम करतात. रस्त्यामुळे दोन गावे, दोन शहरे एकमेकांना जोडली जातात. मामांनी विकासाचे सूत्र हेरून तालुक्यातील रस्त्यांच्या कामावरती लक्ष केंद्रित केले. आज तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली असून तालुका विकासपर्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे. रस्त्यांची कामे मार्गी लागल्यामुळे मामांची तालुक्यात नव्हे तर राज्यामध्ये विकासपुरुष व रस्ते मंत्री या नावाने ओळख निर्माण झाली आहे.

लाकडी-निंबोडी सिंचन योजनेचे शिल्पकार
धरण उशाला अन् कोरड घशाला अशी मराठीमध्ये म्हण आहे. अशीच काहीशी अवस्था इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी परिसरातील शेतकऱ्यांची होती. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये समावेश असलेले उजनी धरण तालुक्यात असूनही लाकडी- निंबोडी सिंचन योजनेचे काम २५ वर्षापासून रखडले होते. लाकडी-निंबोडी परिसरासह १० गावातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याचे व खडकवासला कालव्याचे पाणी शेतीसाठी मिळत नव्हते. यामुळे या भागातील जमीन जिरायती राहिली होती. उजनी जलाशयातून लाकडी-निंबोडी सिंचन योजनेसाठी पाण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, निधीमुळे योजनेचे काम एक नव्हे दोन नव्हे तर २५ वर्ष रखडले होते. लाकडी-निंबोडी सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी अनेक आश्‍वासने देण्यात आली होती. प्रत्येक निवडणुकीमध्ये योजना पूर्ण करण्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना मिळत होते. मामांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर लाकडी-निंबोडी सिंचन योजनेसाठी ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देवून काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालुक्यातील १० गावातील १०, ८४५ एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून तालुक्यातील लाकडी, निंबोडी, काझड, शिंदेवाडी, लामजेवाडी, शेटफळगढे, म्हसोबाची वाडी, निरगुडे, वायसेवाडी, अकोले (धायगुडेवाडी) या गावातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणार आहे. येणाऱ्या काळामध्ये माळरानावरतीही शेती फुलणार असून आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

२२ गावांतील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही
इंदापूर तालुक्याच्या विकासाला गती देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भरणे मामांकडे पाहिले जाते. मामांनी इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्‍न सोडविण्याची केलेली भीष्म प्रतिज्ञा पूर्णत्वाकडे चालली असून यातील लाकडी-निंबोडी सिंचन योजनेच्या पाणी प्रश्‍नाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तालुक्यातील २२ गावांतील पाण्याचा प्रश्‍न सुटेल या आशेवरती तिसरी पिढी जगत असून हा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

इंदापूरसाठी ५ टीएमसी पाण्याच्या तरतुदीचा निर्णय
पुण्यातून उजनी धरणामध्ये वाहून येणाऱ्या ५ टीएमसी सांडपाण्याची इंदापूर तालुक्यासाठी तरतूद करून २२ गावांसह तालुक्यातील इतर गावांचाही पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्याचा मामांनी प्रयत्न केला होता. मात्र, सोलापूरकरांनी विरोध केल्यामुळे ५ टीएमसी पाणी योजना बारगळली. येणाऱ्या काळामध्ये पाणी प्रश्‍न सोडविण्याची मामांनी भीष्म प्रतिज्ञा केली असून २२ गावांचा पाणी प्रश्‍न सोडविल्याशिवाय मामा स्वस्थ बसणारच नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com