नेचर डिलाईट डेअरीची अल्पावधीत भरारी
वालचंदनगर, ता. १२ : कळस (ता.इंदापूर) येथे माळरानावर उद्योजक अर्जुन देसाई यांनी सुरू केलेल्या नेचर डिलाईट डेअरीचा आठवा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. मागील आठ वर्षांत ५० हजार लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला डेअरीचा व्यवसाय शेतकऱ्यांच्या विश्वास व उत्पादनाच्या दर्जाच्या जोरावर १७ लाख लिटर दूध संकलनापर्यंत पोहचला असून डेअरीने अल्पावधीमध्ये भरारी घेतली.
कळसच्या माळरानावर सन २०१७ मध्ये डेअरीची सुरुवात केली होती. सध्या १७ लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. तसेच २१ लाख दूध हातळण्याची डेअरीची क्षमता आहे. डेअरीत सध्या अडीच हजारापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून दूध, तुप, बटर, दूध पावडर, दही पनीर, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पेढा, पनीर बनविले जात आहे. डेअरीमध्ये एक मार्चपासून आईस्क्रिमचे उत्पादनास सुरुवात करण्यात येणार आहे. नेचर उद्योग समूह व देसाई इन्फ्रामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करीत आहे. पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविली असून, एक डिसेंबरपासून दररोज दोन हजार टन पशुखाद्य निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच दररोज ४.५ लिटर मिनिअर वॉटर निर्मिती सुरू असल्याचे नेचर उद्योग समुहाचे प्रमुख अर्जुन देसाई यांनी सांगितले. नेचर डिलाईट डेअरीचा आठवा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला चिपळूणचे आमदार शेखर निकम उपस्थित होते.
यावेळी कंपनीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अर्जुन देसाई यांनी सांगितले की, कंपनीचा विकास हा शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार असून, नवनवीन सामाजिक उपक्रम राबवणार आहोत. कार्यक्रमाला संचालक डॉ. जय देसाई,संचालक मयूर जामदार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. सिंग, दीपक देसाई, सुनील देसाई, संदीप देसाई उपस्थित होते.
सामाजिक हित जोपासणारी डेअरी
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नेचर उद्योग समूह सातत्याने प्रयत्नशील असतो.राज्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी नेचर उद्योग समूहाने ११ लाख रुपयांची रोख मदत व ५० हजार पाण्याची बाटल्या दिल्या होत्या.
05635
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

