कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे पुरंदरला नियोजन कोलमडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे 
पुरंदरला नियोजन कोलमडले
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे पुरंदरला नियोजन कोलमडले

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे पुरंदरला नियोजन कोलमडले

sakal_logo
By

वाल्हे, ता. १३ : प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (ता. १३) आयोजित केलेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्पचे नियोजन ढिसाळ कारभारामुळे कोलमडले. सकाळी शस्त्रक्रियेसाठी येणारे सर्जन सायंकाळी चार वाजता पोहोचल्याने रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दिवसभर अन्न-पाण्यावाचून उपाशी राहिलेल्या महिलांना सायंकाळी शस्त्रक्रियाविना परत पाठवण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांच्या कॅम्पचे शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व नीरा या ठिकाणी आयोजित केले होते. मात्र, शस्त्रक्रियेसाठी येणारे सर्जन बेलसर या ठिकाणी दुपारनंतर येणार असल्याने नीरा येथील कॅम्प रद्द करून वाल्हे व नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी फक्त दहा रुग्ण बेलसर येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शिबिर सर्जन तब्बल चार वाजता पोहोचल्याने वेळेअभावी केवळ बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वाल्हे व नीरा येथील महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेत आजच्या शिबिरात आम्हासही सामावून घ्या, असा आग्रह धरला. मात्र, बेलसर येथील रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांची फक्त शस्त्रक्रिया होईल, असे सांगितल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अखेर वाल्हे व नीरा येथील दहापैकी प्रत्येकी पाच रुग्ण शस्त्रक्रियेसाठी घेण्याची तयारी केली. मात्र, शस्त्रक्रिया केली तर सर्वांची करावी, असा आग्रह धरला. मात्र, वेळेअभावी शक्य नसल्याने रुग्णांना शस्त्रक्रियेविना परत पाठवण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली.

Web Title: Todays Latest District Marathi News Whl22b00072 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top