भैरवनाथ विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक बरकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरवनाथ विकास सोसायटीच्या 
अध्यक्षपदी अशोक बरकडे
भैरवनाथ विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक बरकडे

भैरवनाथ विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक बरकडे

sakal_logo
By

वाल्हे, ता. २६ : पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील भैरवनाथ विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक छबन बरकडे व उपाध्यक्षपदी शालन माणिकराव चोरमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकतेच भैरवनाथ विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान, नुकतीच पिसुर्टी (ता. पुरंदर) येथे निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. बागवान यांच्या देखरेखीखाली निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदासाठी अशोक बरकडे व
उपाध्यक्षपदासाठी शालन चोरमले यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दत्तात्रेय गायकवाड, विजय चोरमले, महादेव बरकडे, विठ्ठल बरकडे, राजू भुजबळ, माणिक बरकडे, मुरलीधर बरकडे, नाना चोरमले, सचिन बरकडे, रत्नमाला बरकडे या संचालकांची बिनविरोध निवड झाली.
अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीनंतर पोपट बरकडे व पुणे जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित
संचालकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माणिकराव चोरमले, खंडू चोरमले, दादा बरकडे, बाळासाहेब चोरमले, पोपट बरकडे, विठ्ठल बरकडे, संपत बरकडे, अंकुश बरकडे, शुभम बरकडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Whl22b00075 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top