
मांडकीत पालखीच्या स्वागतासाठी गुढ्या मांडकीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी
वाल्हे, ता.२७ : संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा वीर, लपतळवाडी या गावांचे स्वागत स्वीकारीत मांडकी (ता. पुरंदर) येथे दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला. यावेळी टाळमृदुंगाचा जयघोषात अवघे मांडकी गाव दुमदुमले होते तर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
पालखी सोहळ्याचे रविवारी (ता.२६) सायंकाळी सहाच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरींच्या वर्षावामध्ये आगमन झाले. ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. घरांवर गुढ्या उभारल्या होत्या. पारंपरिक ढोल-लेझीमच्या तालावर मांडकी येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचा खेळ करीत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. सायंकाळी पावणेसात वाजता ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये पालखी विसावली. चोपदारांनी सूचना केल्यानंतर हजारो वैष्णवांच्या उपस्थित समाज आरती झाली. आरतीनंतर रात्री उशीरापर्यंत भाविकांनी दुतर्फा रांगा लावून सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी लपतळवाडी, मांडकी, जेऊर, वाल्हे, पिसुर्टी, हरणी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने आले होते.
सोमेश्वरचे संचालक विश्वास जगताप, मोहन जगताप, सरपंच प्रियांका शिंदे, उपसरपंच विश्वास जगताप यांच्या हस्तेही पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त गोपाळ गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस पाटील प्रवीण जगताप, विजय साळुंके, सतीश जगताप, रामचंद्र जगताप, संजीवन जगताप, महेश साळुंके, राहुल जगताप, आदी उपस्थित होते.
दरम्यान, लपतळवाडी येथे सरपंच सुवर्णा कदम, उपसरपंच रवींद्र मोरे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुंडलिक कदम, सचिन शेटे, सुशील लोळे, महादेव पिलाणे आदी उपस्थित होते.
...
00236
Web Title: Todays Latest District Marathi News Whl22b00098 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..