वाल्ह्यात नागशिल्पाचे पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्ह्यात नागशिल्पाचे पूजन
वाल्ह्यात नागशिल्पाचे पूजन

वाल्ह्यात नागशिल्पाचे पूजन

sakal_logo
By

वाल्हे, ता. २ : दूध, लाह्या वाहू नागोबाला चल ग सखे वारूळाला नागोबाला पूजायला... अशा पारंपारिक गाण्यांच्या सुरावर वाल्हे (ता. पुरंदर) येथील महिलांनी झिम्मा, फुगड्या व फेर धरत येथील आद्यरामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषी मंदिराच्या प्रांगणातील औदुंबराच्या झाडाखालील प्राचीन काळातील नागशिल्पाची पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजा केली.
यावेळी कोणी फुगड्या घालण्यात दंग होत्या. तर बऱ्याच सुवासिनींनी फेर धरुन सासर माहेरच्या नात्यांना गाण्यांमध्ये गुंफत आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी सुनीता पवार, सम्राज्ञी लंबाते, रश्मी पवार, माधुरी काबरा, अनुराधा काळंगे, बरखा जाधव, सुनंदा बाम्हणे, श्रेया काळंगे आदि महिला उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Whl22b00166 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..