वाल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वाल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By

वाल्हे, ता. ११ : येथील (ता.पुरंदर) मुख्य बाजारपेठेजवळ मंडईमधील रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी पंधरा दिवसांपूर्वी खोदला आहे. त्याच्यावरती
अद्यापही काम सुरू न झाल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर दुसरीकडे या ठिकाणी हा रस्ता खोदून ठेवल्याने बाजारातील छोट्या शेतकरी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

रस्ता खोदल्याप्रकरणी विचारणा केली असता ग्रामपंचायत व पंचायत समितीचा बांधकाम विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. वाल्हे येथील मुख्य बाजारपेठनजिक पवारआळीकडे जाणारा भाजीमंडई रस्ता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र तेव्हापासून ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा नॉटरिचेबल असल्याने रस्ता नक्की का खोदला असा प्रश्न ग्रामस्थांच्यात निर्माण झाला आहे.

वाल्हे आठवडे बाजारामध्ये या ठिकाणी अनेक छोटे-मोठे व्यावसायिक व शेतकरी आपला माल घेऊन विक्रीसाठी बसत होते. मात्र गेल्या तीन बाजारी त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ता खोदून ठेवल्याने ग्राहक फिरकत नसल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी सांगितले.

खोदून ठेवलेल्या रस्त्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर
डास तयार झाले असून गावात डासांमुळे व अस्वच्छ पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्णाम झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम होणार नसेल तर प्रशासनाने तो रस्ता पुन्हा बुजवून पुर्ववत करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित रस्त्याचा उतार व्यवस्थित न काढल्याने काम थांबविण्यात आल्याचे सांगितले. तर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने या रस्त्याचे भवितव्य धोक्यात आले आहे.
- अमोल खवले, सरपंच वाल्हे (ता.पुरंदर)

00417

Web Title: Todays Latest District Marathi News Whl22b00179 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..