लपतळवाडी ग्रामस्थांनी जपली ५१ वर्षांची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लपतळवाडी ग्रामस्थांनी जपली ५१ वर्षांची परंपरा
लपतळवाडी ग्रामस्थांनी जपली ५१ वर्षांची परंपरा

लपतळवाडी ग्रामस्थांनी जपली ५१ वर्षांची परंपरा

sakal_logo
By

वाल्हे, ता. ८ : पुरंदर तालुक्यातील लपतळवाडी येथे तरुण मंडळांनी जवळपास ५१ वर्षांची ‘एक गाव एक गणपतीची’ परंपरा जोपासत गावामध्ये व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक देखावे, नाटक, भारुड असे विविध उपक्रम राबविले. कीर्तन, भजन तसेच आध्यात्मिक कार्यक्रमही सुरू करून तालुक्यातील इतर मंडळासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
लपतळवाडी (ता. पुरंदर) येथे गावाने आपली ५१ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा अखंडितपणे सुरू ठेऊन गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून गणेशोत्सवाची सर्वस्वी जबाबदारी यात्रा कमिटीवर सोपविली आहे. यात्रा कमिटीला नवयुग श्रीनाथ तरुण मंडळ, लिमजाईमाता युवा प्रतिष्ठान व श्रीनाथ तरुण मंडळासह ग्रामस्थांच्या सहकार्याने कोणत्याही मानसन्माची अपेक्षा न ठेवता सरकारची ‘एक गाव, एक गणपतीची’ संकल्पना व गावाची परंपरा चालू ठेवली आहे. या दरम्यान गणेशोत्सवानिमित्त रोज भजन, कीर्तनाबरोबच शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व नाटिकांचे आयोजन केले आहे. दररोज सायंकाळी गावातील अबाल वृद्ध मंडळी एकत्र जमून आरती करतात.

Web Title: Todays Latest District Marathi News Whl22b00233 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..