वाल्ह्यात भवानीमातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्ह्यात भवानीमातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता
वाल्ह्यात भवानीमातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता

वाल्ह्यात भवानीमातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता

sakal_logo
By

वाल्मिकनगरला धार्मिक कार्यक्रम; फटाक्यांची आतषबाजी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
वाल्हे, ता. ४ : येथील वाल्मिकनगरीमधील ग्रामदेवता, शिवकालीन भवानीमातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता परंपरागत पद्धतीने ढोल-ताशांचा गजर, शोभेच्या दारूची आतषबाजी करीत करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.


नवरात्री उत्सवादरम्यान उपवास काळात उष्णता वाढते म्हणून देवाचा दाह कमी करण्यासाठी ग्रामदेवतेला परंपरेनुसार नागिणीच्या पानांची आरास करण्यात आली होती. सोमवार (ता. ३) रोजी आठव्या माळेचा उत्सव उत्साहात साजरा झाला. रात्री नऊ वाजताची धुपारती होऊन सजविलेल्या
पालखीत श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांचे मुखवटे ठेवून छबिना मार्गस्थ झाला. रात्री साडेदहा वाजता छबिन्याचे डोंगरावर आगमन होताच भवानीमाता मंदिरासमोर केलेली फटाक्यांची
आतषबाजी नवरात्रोत्सवाचे आकर्षण ठरले. हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपण्यासाठी वाल्हेकर सरसावले होते. काळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर
आतषबाजीमध्ये चमचमणारे मोबाईल चांदण्यांचा आभास निर्माण करुन गेले.

रात्री साडेबारा वाजता मानकरी गिरीश पवार, नारायण पवार यांच्या हस्ते पूजा करुन देवीचा घट उठविण्यात आला. यावेळी सर्व सालकरी, मानकरींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डोंगरावरील शिवकालीन भवानीमाता मंदिरास फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता. नवरात्र काळात दोन प्रहरात देवाची पूजा, छबिन्यासह पालखीची मंदिर प्रदक्षिणा, भजन, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
आले होते. डोंगरावरील कार्यक्रमांचे नियोजन, दैनंदिन व्यवस्थापन देवीचे पुजारी रमेश भोसले यांसह मानकरी, सेवेकरी यांनी पाहिले.
......