भैरवनाथ ट्रस्टच्यावतीने वाल्हेत इमारतीचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरवनाथ ट्रस्टच्यावतीने
वाल्हेत इमारतीचे भूमिपूजन
भैरवनाथ ट्रस्टच्यावतीने वाल्हेत इमारतीचे भूमिपूजन

भैरवनाथ ट्रस्टच्यावतीने वाल्हेत इमारतीचे भूमिपूजन

sakal_logo
By

वाल्हे, ता. ६ : वाल्हे (ता. पुरंदर) येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ ट्रस्टच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार, माजी अध्यक्ष साहेबराव पवार, सरपंच अमोल खवले, लक्ष्मण पवार, बाळासाहेब राऊत आदी विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के, प्रवीण कुमठेकर, बाळासाहेब भुजबळ, हनुमंत पवार, प्रा. संतोष नवले, सचिन देशपांडे, सचिन आगलावे,
सूर्यकांत भुजबळ आदी उपस्थित होते.

ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थांचे सहकार्य नेहमीच लाभले असून, आगामी मारुती मंदिरासह ट्रस्टच्या इमारतीच्या दर्जेदार जीर्णोद्धारासाठी लोकसहभाग मिळावा, असा आशावाद संदेश शिर्के यांनी यावेळी व्यक्त केला.
ट्रस्टचे सचिव शशिकांत दाते यांनी आभार मानले.
...

...