वाल्हे येथे सोपानकाकांच्या पालखीचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हे येथे सोपानकाकांच्या पालखीचे स्वागत
वाल्हे येथे सोपानकाकांच्या पालखीचे स्वागत

वाल्हे येथे सोपानकाकांच्या पालखीचे स्वागत

sakal_logo
By

वाल्हे, ता. ८ : टाळ-मुदंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा गजर करत, वाल्हे (ता.पुरंदर) येथे संत सोपानकाका ''पंचक्रोशी प्रदक्षिणा'' पालखी सोहळ्याचे फटाक्यांच्या आतषबाजित मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उद्या पहाटे सहा वाजता पालखी सोहळा भोंगवलीकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.
शिवरी येथून निघालेला पालखी सोहळा आज शनिवारी (ता. ८) पहाटे धिम्या गतीने वाल्हेकडे मार्गस्थ झाला. वाल्हे येथे आज सायंकाळी आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन मुक्कामासाठी येथील महर्षी वाल्मीकी मंदिराच्या प्रांगणामध्ये सोहळा विसावला. येथे वाल्हेचे सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सोहळ्यातील वैष्णवांचे शशिकांत दाते, लक्ष्मण पवार, दीपक कुमठेकर, त्रिंबक भुजबळ, गुलाब
भुजबळ आदींनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
ग्रामपंचायतीतर्फे दिंडीप्रमुख माऊली कदम, सुधाकर गिरमे, कैलास भोसले, फुगे, रोहिदास हरदे, ज्ञानोबा लांगडे, स्वामी गोवर्धने, गौरव उंडाळे यांसह चोपदार, विणेकरी आदींचा सत्कार
करण्यात आला.
00691