कार्यरत राहिल्यामुळेच जनतेच्या हृदयात : दुर्गाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यरत राहिल्यामुळेच जनतेच्या हृदयात : दुर्गाडे
कार्यरत राहिल्यामुळेच जनतेच्या हृदयात : दुर्गाडे

कार्यरत राहिल्यामुळेच जनतेच्या हृदयात : दुर्गाडे

sakal_logo
By

वाल्हे, ता.१३ : जनसामान्यांच्या विषयीचा आपलेपणा आणि शाश्वत विकास हे ध्येय समोर ठेऊन कार्यरत राहिल्यामुळेच एक जीवाभावाचा माणुस म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करता आले. माझ्यासाठी आयुष्यभराची हीच खरी मोठी कमाई असल्याचे भावोदगार पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी काढले.

वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रापंचायतीच्या वतीने आज रविवार (ता.१३) महाराष्ट्र राज्य बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नागरी सत्काराचे आयोजन कऱण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.दिगंबर दुर्गाडे बोलत होते. याप्रसंगी गुळूंचे सरपंच संतोष निगडे, महादेव चव्हाण, सुर्यकांत पवार, सुनील पवार, अशोक बरकडे, गोरख कदम, त्रिंबक भुजबळ, रावसाहेब चव्हाण,बजरंग पवार, मोहन पवार आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच अमोल खवले व उपसरपंच अंजली कुमठेकर यांच्या हस्ते प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी समदास भुजबळ, अंजली कुमठेकर, चित्रा जाधव, सुनीता भुजबळ, कल्पना राऊत,धनंजय भुजबळ, हनुमंत पवार, माणिक चोरमले, सविता भुजबळ आदिंची भाषणे झाली. संदेश पवार, अभिषेक दुर्गाडे, संतोष दुर्गाडे, पवन दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, रणजीत पवार, सागर भुजबळ आदिंनी संयोजन केले.
सरपंच अमोल खवले यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत भुजबळ यांनी सूत्रसंचालन तर प्रा.संतोष नवले यांनी आभार मानले.

00817