
पोलिस भरती मुदतवाढीने इच्छुकांकडून कसून तयारी
वाल्हे, ता. २ ः राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याने तरुणांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर महिनाभरापासून तरुणांनी डोंगरमाळरानासह सपाट मैदानावर धावण्यासह पोलिस भरतीच्या विविध परीक्षांमध्ये स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचबरोबर मुदतवाढीनंतर इच्छा असूनही वेळेअभावी कागदपत्रे सादर करू न शकलेल्या इच्छुकांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.
आतापर्यंत जवळपास ११ लाखांच्या वर इच्छुकांच्या पोलिस भरतीसाठी अर्ज केले असून अनेकांना शासकीय कागदपत्रे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता तेसुद्धा मुदतवाढ मिळाल्याने भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांनी सकाळच्या थंड हवेत धावण्यासह इतर व्यायाम करण्यास जोर धरला असून, प्रत्येकजण कोणत्याही शारीरीक त्रुटी राहू नये, याची काळजी घेताना दिसत आहे.
दरम्यान, पोलिस भरतीसाठी मुदतवाढ दिल्याने अर्ज सादर करणे व शारीरीक त्रृटी राहू नये यासाठी सराव करण्यास वेळ उपलब्ध झाल्याने गौरव गायकवाड, सूरज धिवार, अक्षय ढोबळे, धीरज धिवार, प्रसाद पवार आदींनी समाधान व्यक्त केले.
...----------------------
...
ssociated Media Ids : WHL22B00882, WHL22B00883