पिंगोरी येथील उलूक महोत्सवातून जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगोरी येथील उलूक महोत्सवातून जागृती
पिंगोरी येथील उलूक महोत्सवातून जागृती

पिंगोरी येथील उलूक महोत्सवातून जागृती

sakal_logo
By

वाल्हे, ता. २ ः उलूक महोत्सव शालेय विद्यार्थ्यांसह उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असल्याचे गौरवोद्‍गार पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी काढले.
सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरी (ता. पुरंदर) येथे इला फाउंडेशनच्या वतीने तिसऱ्या दोन दिवसीय उलूक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यावेळी सरनोबत बोलत होत्या.
या प्रसंगी सरपंच संदीप यादव, राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य नंदकुमार सागर, डॉ. संजय रावळ, सुधाकर जगदाळे, रामदास शिंदे, प्रकाश शिंदे, जीवन शिंदे, ज्योती शिंदे, मनिषा म्हेत्रे, रूपाली पिसाळ आदींसह विविध शाळांतील शिक्षक उपस्थित होते.
वन्यजीव संवर्धनासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने इला फाउंडेशनच्या वतीने उलूक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थिदशेपासून संवर्धनाची ओढ विद्यार्थ्यांना लागावी त्यादृष्टीने संवर्धनाचे महत्त्व वनसंपत्तीचे जतन झाले पाहिजे व त्यासाठी लोकचळवळ आवश्यक असल्याचे मत व्यक्त करतानाच हे काम इला फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. सतीश पांडे व त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांनी सुरू केलेला उलूक महोत्सव हा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी इला फाउंडेशनच्या वतीने प्रथमच निसर्ग संवर्धनासाठी काम करणारे अकोला येथील कर्करोगग्रस्त कार्यकर्ते बाळ काळणे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच निसर्ग संवर्धनासाठी झटणारे राजकुमार पवार व मुरलीधर महाजन या स्वसंयेवकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. सुरुची पांडे यांनी सूत्रसंचालन केले. तर राजकुमार पवार व राहुल लोणकर यांनी आभार मानले.