महर्षी वाल्मिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महर्षी वाल्मिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
महर्षी वाल्मिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

महर्षी वाल्मिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

वाल्हे, ता. १२ : रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत वाल्हे (ता.पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या आदर्श सामाजिक फाउंडेशन आयोजित रविवारी (ता. ११)स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
तब्बल ३३ वर्षांपूर्वी विद्यालयात दहावीत शिक्षण घेतले. पण त्यांना त्यांचा पुनश्च भेटीचा योग सोशल मिडीयामुळे पुन्हा घडून आला. व्हाटसअपच्या माध्यमातून मित्रांना जोडले आणि पन्नास मित्र-मैत्रिणी एकत्र आले.येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात रविवारी एकत्र आलेल्या तत्कालीन शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ह. व्हि. रेवले होते.
याप्रसंगी प्रमोद शहा, पी.एस.जाधव, विष्णू चौधरी, एन.जी. निकम, हाडंबर, व्हि.डी. बर्गे, मारुती जगताप, डी.आर.पालकर, पी. एच. शिंदे, बी.आर. पाटील, एस. एम. पोतेकर, प्राचार्य अब्दुलगफारखान पठाण, पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ तत्कालीन शिक्षक विष्णू चौधरी यांच्या पहाडेदार आजावातील सूचनेनंतर एकसुरात राष्ट्रगीताने झाली. त्या‌नंतर सर्वांनी लहानपणीचे किस्से, घटना आठवून आनंद घेतला. या वर्गमित्रांपैकी बरेचजण परगावी स्थिरावले, असून गावात राहणारे एकमेकांच्या संपर्कात असतात. महर्षी वाल्मीकी विद्यालय आता बदलले असून विद्यालयात नविन इमारत उभारली आहे. जुन्या इमारतीच्या वर्गखोल्या, खेळाचे मैदान आदींची आठवण सुखद असून, बालपणीचा काळ सुखाचा हे वास्तव असह्य करते, असे प्रत्येकाने आवर्जून सांगितले.
स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी मंजूषा दळवी, रावसाहेब चव्हाण, दत्तात्रेय कुमठेकर, सोनल दोशी, लाला माने, सुरेश भुजबळ,
हिराचंद पवार, महावीर भुजबळ आदींनी परिश्रम घेतले. स्नेहमेळाव्यादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी जीवनातील आनंदाचे क्षण उलगडले. दिवसभर आनंदात घालविल्यानंतर स्नेहमेळाव्याचा निरोप घेताना सर्वांचे डोळे पाणावले. डॉ. नीलेश शहा यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र डोंगरे यांनी सूत्रसंचालन तर दादासाहेब राऊत यांनी आभार मानले.