वाल्हे येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हे येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी
वाल्हे येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी

वाल्हे येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी

sakal_logo
By

वाल्हे येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी
वाल्हे, ता. ६ : संतांच्या जातींचा विचार करण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या अनमोल विचारांचा ठेवा जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथे राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी संतोष दुर्गाडे, संदेश पवार, संतोष गायकवाड, शिरीष नवले, अभिषेक दुर्गाडे, संभाजी मोरे, प्रकाश चव्हाण, रमेश भोसले, अशोक ननावरे आदी उपस्थित होते.
येथील चर्मकार समाज बांधवांच्या वतीने आकर्षक सजविलेल्या ट्रॅक्टरमधून संत रोहिदास महाराजांच्या
प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान चर्मकार समाजाच्या वतीने महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत सावतामाळी यांच्या पुतळ्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

चर्मकार समाजाचे नवनाथ भोसले, सुरेंद्र भोसले, रूपेश भोसले, शैलेश भोसले, सुजल भोसले, ओंकार भोसले, आशिष भोसले, देविदास सकलावे, जनार्दन भोसले, ऊर्मिला भोसले, वैशाली भोसले, मनिषा भोसले, शीतल भोसले, रूपाली भोसले, राणी सकलावे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सायंकाळी चर्मकार समाज बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वाल्हे चर्मकार संघाचे अध्यक्ष मनोज भोसले यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन, तर अनिल भोसले व अनमोल भोसले यांनी आभार मानले.