वाल्हे येथे शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हे येथे शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक
वाल्हे येथे शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

वाल्हे येथे शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

sakal_logo
By

वाल्हे, ता. २० : येथे (ता.पुरंदर) शिवजयंतीनिमित्त फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोलताश्यांच्या गजरात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ''शिवाजी महाराज कि जय''
''जय भवानी जय शिवाजी'' अशा विविध घोषणांनी आसमंत दुमदुमून केला होता. येथील महाराज ग्रुपने पुरंदर किल्ल्याहून शिवज्योती आणली. यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासूनच वाल्हे बाजारपेठ आकर्षक मंडप, विद्युत रोषणाईसह भगव्या पताकांनी सजली होती. बाजारपेठेमध्ये रविवारी (ता. १९) सकाळपासूनच शिवजयंतीचा उत्साह होता. शिवज्योत गावामध्ये पोहचल्यानंतर महिलांनी पंचारती ओवाळत शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. महाराज ग्रुपतर्फे शिवजयंती साजरी करण्याचे हे नववे वर्ष आहे. रांगोळी स्पर्धांचेही आयोजन केले होते.
यावेळी सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पोलिस हवालदार
केशव जगताप, सूर्यकांत भुजबळ, त्रिंबक भुजबळ, दीपक कुमठेकर, शांताराम पवार, देविदास भोसले, कुंडलिक पवार आदी उपस्थित होते.
महाराज ग्रुपचे अध्यक्ष अतुल पवार, शंतनू नवले, सतीश राऊत, स्वरूप ढवळे, अल्ताफ तांबोळी, ओंकार दुर्गाडे, समीर रोकडे, नीलेश पवार, रोहित पवार, जगदीश पवार, गंधर्व शहा आदींनी परिश्रम घेतले.
...

1118