वाल्हेतील भैरवनाथ मंदिराला द्राक्षांची सजावट

वाल्हेतील भैरवनाथ मंदिराला द्राक्षांची सजावट

वाल्हे, ता. २० : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात साठ ते सत्तर किलो द्राक्षांची आकर्षक सजावट केली. सोमवती अमावस्येनिमित्त ग्रामदैवताची पूजा अभिषेक द्राक्षांच्या माध्यमातून केली. श्री भैरवनाथांचा गाभारा वेलींना लगडलेल्या द्राक्षांच्या बागेप्रमाणे चित्र तयार झाल्याने येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.
वाल्हेतील नाथभक्त उमेश भुजबळ, निशांत भुजबळ व सत्यवान भुजबळ यांनी सोमवती अमावस्येनिमित्त स्वखर्चाने द्राक्षे विकत घेऊन पूजेसाठी उपलब्ध करून दिली. मंदिराचे पुजारी सचिन आगलावे यांसह ओम भुजबळ, प्रतीक भुजबळ, कुणाल भुजबळ, श्रीनाथ भुजबळ, भूषण भुजबळ, ओंकार भुजबळ, सुभाष पानसांडे आदींनी परिश्रमातून गाभाऱ्यात द्राक्ष वेलींची आकर्षक सजावट केली. देवस्थान ट्रस्टच्यावतीने द्राक्ष दिलेल्या भक्तांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com