
सुकलवाडी येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मिरवणूक
वाल्हे, ता. २२ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील जागृती फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजगड ते सुकलवाडी शिवज्योतीचे आयोजन केले होते. शिवज्योत गावामध्ये पोचल्यानंतर महिलांनी पंचारती ओवाळून स्वागत केले.
यावेळी ढोल-लेझीम पथक व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह गावातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची घोड्यावर बसून गावांतर्गत जंगी मिरवणूक काढून शिवरायांना अभिवादन केले. तरुण, महिला मुली भगवे फेटे, भगव्या टोप्या परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महिलांनी औक्षण करून फुलांची उधळण करत ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणुकीनंतर पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, माजी सैनिक शिवाजी यादव, शशिकांत दाते यांच्या हस्ते भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले अरविंद सातपुते, पुण्यातील सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, साधना विद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य प्रल्हाद पवार यांचा सपत्निक शिवप्रतिमा, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन तर सुकलवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका सविता सूर्यकांत लंबाते यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपसरपंच संतोष पवार, राहुल यादव, माजी उपसरपंच धनंजय पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष नारायण पवार, अशोक बरकडे, प्रा. संतोष नवले, विकास पापळ, सोनाली यादव, अर्चना पवार, तृप्ती पवार, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गाणी, नाटिका, पोवाडा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. यावेळी जागृती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्रीकांत लक्ष्मीशंकर व झी मराठी फेम अर्पिता पवार-आमराळे यांनी शिवरायांचा जीवनपट सांगितला. नितीन पवार, राजकुमार पवार, धनंजय पवार, ऋषिकेश कोंढाळकर, प्रशांत दाते, सतीश पवार, ज्ञानदेव पवार, तुषार पवार, विक्रम यादव आदी जागृती फाउंडेशनच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सुधाकर पवार यांनी प्रास्ताविक केले. संदेश पवार यांनी आभा मानले