वाल्हेत गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हेत गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
वाल्हेत गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

वाल्हेत गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

sakal_logo
By

वाल्हे, ता. २ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयामधील केंद्रामध्ये आज दहावीची परिक्षा सुरळीतपणे सुरू झाली. परिक्षा केंद्रात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आजचा पहिला पेपर असल्याने पालकांनी केंद्रावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. परिक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे, प्राचार्य अब्दुलगफारखान
पठाण यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी सरपंच अमोल खवले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केंद्रउपसंचालक पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार, अरविंद भोसले, मधुकर जगताप, जालिंदर जगताप, नारायण पवार, शरद जगताप, किशोर कुदळे, दादासाहेब राऊत, धनंजय शिंदे, राजेशकुमार सोनवणे आदि उपस्थित होते. वाल्हे केंद्रामध्ये इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी वाल्हेसह, दौंडज, पिंगोरी, जेऊर, मांडकी, हरणी येथील २७५ विद्यार्थी बसले आहेत.