आडाचीवाडी येथे तानाजीबाबा यात्रेनिमित्त भाकणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडाचीवाडी येथे तानाजीबाबा यात्रेनिमित्त भाकणूक
आडाचीवाडी येथे तानाजीबाबा यात्रेनिमित्त भाकणूक

आडाचीवाडी येथे तानाजीबाबा यात्रेनिमित्त भाकणूक

sakal_logo
By

वाल्हे, ता. ७ : आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे धूलिवंदन व तानाजीबाबा यात्रेनिमित्त देवाची भाकणूक (भविष्यवाणी) व गजे
गोपाळ (जेवणावळी) करण्यास सुरुवात झाली. मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत ‘नाथ साहेबाचं चांगभलं’चा जयघोष करत भाकणूक साजरी करण्यात आली.
पाऊस, आरोग्य, वातावरण या विषयावर भविष्यवाणी सांगितली. आडाचीवाडी येथील तानाजीबाबा यात्रा व फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पहाटे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांची महापूजा करण्यात आली. सकाळपासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मानकऱ्यांच्या वतीने देवाला पोशाख घालण्यात आला. त्यानंतर देवाची धुपारती झाल्यावर देवाचे मानकरी शंकर पवार व गेनबा पवार, निवृत्ती भुजबळ यांनी भविष्यवाणी सांगितली.
यावर्षी मृगाचे पाणी चार खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, बाजरीचे पीक चांगले येईल. गाई-गुरे, शेळीमेंढी यांसह मनुष्यामागे साधारण रोगराई राहील. हत्तीचे पाऊस चार खंडात पडून जनतेचे समाधान होईल. आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल. वेळेत पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याला सव्वास सव्वाशेर मिळणार असल्याची भविष्यवाणी सांगण्यात आली. भाकणूक झाल्यावर उत्सवमूर्तींची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर छबिन्याची सांगता झाली.
या प्रसंगी मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के, सरपंच दत्तात्रेय पवार, सूर्यकांत पवार, भाऊसाहेब पवार, शंकर पवार, मोहन पवार, महेंद्र शिर्के, सूरज पवार, संभाजी पवार, हिम्मत शिर्के, मुरलीधर पवार, गेनबा पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.