वाल्हे येथे शिवराय, फुले यांच्या प्रतिमांचे पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हे येथे शिवराय, फुले यांच्या प्रतिमांचे पूजन
वाल्हे येथे शिवराय, फुले यांच्या प्रतिमांचे पूजन

वाल्हे येथे शिवराय, फुले यांच्या प्रतिमांचे पूजन

sakal_logo
By

वाल्हे ,ता. ११ : ''''लोकशाही व स्वातंत्र्य मजबूत राखण्यासाठी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराज, शाहू-फुले-आंबेडकर, संत व
समाजसुधारकांच्या विचारांची खरी गरज आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या कार्याचे, विचारांचे अनुकरण महिलांनी करावे,'''' असे मत पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शुक्रवारी (ता.१०) तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती व सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी दुर्गाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, सत्यवान सूर्यवंशी, सूर्यकांत भुजबळ, संतोष दुर्गाडे, मनोज भुजबळ, दादासाहेब राऊत, देवीदास भोसले, विकास पवार, शिरीष नवले, वनराज पवार आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश पवार, राणी शहा, हनुमंत पवार, मारुती पवार, सागर पवार, शुभदा भुजबळ आदींनी
कार्यक्रमाचे संयोजन केले. सरपंच अमोल खवले यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन तर उपसरपंच अंजली कुमठेकर यांनी आभार मानले.
...
01182