जेऊर येथे रंगला खेळ पैठणीचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेऊर येथे रंगला खेळ पैठणीचा
जेऊर येथे रंगला खेळ पैठणीचा

जेऊर येथे रंगला खेळ पैठणीचा

sakal_logo
By

वाल्हे, ता. १४ : जेऊर (ता. पुरंदर) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत जेऊर व चंदुकाका सराफ अॅंड सन्स यांच्या वतीने महिलांसाठी ''हा खेळ पैठणीचा'' (होम मिनिस्टर) व हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‍घाटन नेहा शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महिलांना खेळाद्वारे भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच या स्पर्धेमध्ये पैठणीचा मान हेमा राजेंद्र पवार, सोन्याच्या नथीचा मान मनिषा राजेंद्र धुमाळ तर ठुशीचा मान पल्लवी दत्तात्रेय पवार यांनी पटकावला.
याप्रसंगी सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष उत्तम धुमाळ, सोमेश्वरचे संचालक अनंता तांबे, सरपंच शोभा तांबे, अॅड. शिवदास तांबे,
माजी सरपंच स्वाती शिरसट, हिराबाई धुमाळ, धनश्री ठोंबरे, माजी उपसरपंच माऊली धुमाळ, नारायण तांबे, बाळासाहेब धुमाळ, संभाजी ठोंबरे, राहुल शिरसट, एस. एस. जगताप आदी उपस्थित होते. उत्तम धुमाळ यांनी प्रास्ताविक केले.

1184