वाल्हे येथून गायीची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हे येथून गायीची चोरी
वाल्हे येथून गायीची चोरी

वाल्हे येथून गायीची चोरी

sakal_logo
By

वाल्हे, ता. १६ : वाल्हे-मधला मळा (ता. पुरंदर) येथील विठ्ठल महादेव पवार या पशुपालकाची गाय गुरुवारी (ता. १६) सकाळी चोरट्याने चोरुन नेली. याबाबत वाल्हे पोलिस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल पवार हे गावठाणात वास्तव्यास असून, त्यांचा गोठा मधलामळा येथील शेतामध्ये आहे. तेथे तीन जनावरे बांधलेले होती. ते गुरुवार सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्यामध्ये गेले असता एक मोठी गाय दिसली नाही. त्यानंतर त्यांनी परिसरात गायीचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. जवळपास एक लाख रुपये किमतीची ही गाय होती. दरम्यान, यापूर्वी वरचमळा येथील पशुपालकाची एक गाय चोरट्याने चोरुन नेली असून, आज पुन्हा पवार यांची गाय चोरुन नेल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत बोलताना विठ्ठल पवार म्हणाले, ‘‘आमच्या तीनपैकी एका गाभण गाईचा दोन दिवसांपूर्वी विक्रीचा व्यवहार सुरू होता. आम्ही गाईची एक लाख रुपये किंमत सांगितली असता ८५ हजार रुपयांवर व्यवहार ठरला होता. संबंधितांनी दोन दिवसांत पैसे जुळवाजुळव करून पैसे देण्याचे ठरले होते. आज नेहमीप्रमाणे सकाळी गोठ्यामध्ये गेलो असता गोठ्यामध्ये गाय दिसून आली नाही. परिसरामध्ये इतरत्र शोध घेतला असता गाई दिसून आली नाही.’’