वाल्हे येथे नेत्र शिबिराचा ९० महिलांनी घेतला लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हे येथे नेत्र शिबिराचा ९० महिलांनी घेतला लाभ
वाल्हे येथे नेत्र शिबिराचा ९० महिलांनी घेतला लाभ

वाल्हे येथे नेत्र शिबिराचा ९० महिलांनी घेतला लाभ

sakal_logo
By

वाल्हे, ता.२६ : वाल्हे (ता.पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मंगळवारी (ता. २५) महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. येथील संत सावतामाळी मंदिरामध्ये शिबिराचे खास आयोजन केले होते. शिबिराचा जवळपास ९० महिलांनी लाभ घेतला.
शिबिराचे उद्‌घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अंजली कुमठेकर, सागर भुजबळ, आशा भुजबळ, हेमलता जाधव, मधुरा भुजबळ आदि उपस्थित होते.
शिबिरात मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, ग्लोकोमा, दृष्टी अधू असणे, थायरॉईड संलग्न डोळ्यांचे विकार तसेच रिप्रेक्टीव्ह एरर्स आदी वयोमानानुसार उद्‌भवणाऱ्या समस्यांचा समावेश असणाऱ्या महिलांमधील नेत्र आजार वाढत आहे, असे वैद्यकीय अधिकारी गणेश पवार यांनी सांगितले.
औंध रुग्णालयातील डॉ.रंजना कुंभार यांनी महिलांची तपासणी केली. आशा पर्यवेक्षिका वैशाली दानवले, आशा स्वयंसेविका ज्योती महांगरे, सविता दु्र्गाडे, ज्योती पवार, रोहिणी पवार, अलका नलावडे आदींनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. पर्यवेक्षिका संजीवनी दरे यांनी आभार मानले.