वाल्हे येथे आगीत शेतकऱ्याचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हे येथे आगीत शेतकऱ्याचे नुकसान
वाल्हे येथे आगीत शेतकऱ्याचे नुकसान

वाल्हे येथे आगीत शेतकऱ्याचे नुकसान

sakal_logo
By

वाल्हे, ता. १४ : येथील वरचामळा येथे रावसाहेब विठ्ठल भुजबळ यांच्या घराशेजारील गोठावजा खोलीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (ता. १५) पहाटेच्या सुमारास घडली. यामध्ये दोन दुचाकी, तीन सायकली, जनावरांचा चारा, सरपण, घरातील विद्युत उपकरणे आदी शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. भुजबळ यांची परिस्थिती बेताची असून मोलमजुरी, दुग्धव्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. या दुर्घटनेमुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला.
एकनाथ भुजबळ यांच्या शेजारी राहणारे पहाटे नेहमीप्रमाणे उठून घराबाहेर आले असता त्यांना यांच्या घराशेजारी गोठ्यामधून धुराबरोबरच आगीचे लोळ दिसले. त्यांनी रावसाहेब भुजबळ झोपेतून उठवून याबाबत माहिती दिली. आगीची तीव्रता मोठी होती. गोठ्यामध्ये सरपण व शेजारील सुक्या वैरणीमुळे आगीचे उग्र रूप धारण केल्याने गोठा जळून खाक झाला. यामध्ये दोन दुचाकी, तीन सायकली, जनावरांचा चारा, सरपण, विद्युत उपकरणे आदींसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या गोठ्याशेजारी जनावरे बांधलेली होती.
त्यांना आगीची आच लागली. एका जनावराच्या चेहऱ्याला थोडे भाजल्याचा अपवाद वगळता सुदैवाने सर्व जनावरे सुखरूप गोठ्याच्या बाहेर काढण्यात आली. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान सकाळी वाल्हे पोलिस ठाण्याचे हवालदार केशव जगताप व घनशाम चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच अमोल खवले, गणेश भुजबळ, ओम भुजबळ आदी उपस्थित होते. या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी बहुतांश घराबाहेरील पाणी तापविण्याची भांडी देखील चोरीला गेल्याचे गणेश भुजबळ यांनी सांगितले.

०१४५६