आमदार संजय जगताप यांच्यातर्फे जळीतग्रस्त भुजबळ कुटुंबास मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार संजय जगताप यांच्यातर्फे जळीतग्रस्त भुजबळ कुटुंबास मदत
आमदार संजय जगताप यांच्यातर्फे जळीतग्रस्त भुजबळ कुटुंबास मदत

आमदार संजय जगताप यांच्यातर्फे जळीतग्रस्त भुजबळ कुटुंबास मदत

sakal_logo
By

वाल्हे, ता.२० : वाल्हे (ता.पुरंदर) नजिक वरचामळा येथील रावसाहेब विठ्ठल भुजबळ यांच्या गोठावजा खोलीला आग लागली होती. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये दोन दुचाकी, तीन सायकली, जनावरांचा चारा, सरपण, घरातील विद्युत उपकरणे आदी शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. याबाबतचे वृत्त ''सकाळ''मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शुक्रवारी (ता.१९) पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्यावतीने जळीतग्रस्त कुटुंबास आर्थिक मदत देण्यात आली.

पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वतीने पुरंदर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण व पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते यांच्या हस्ते वरचामळा येथील भुजबळ कुटुंबास भेट देत रावसाहेब भुजबळ यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी सरपंच अमोल खवले, बाळासाहेब भुजबळ, रफिक शेख, संदीप दाते, बजरंग पवार, शरद कदम, मोहन ढोबळे, अनिल पवार, ज्ञानेश्वर भुजबळ, बाळासाहेब पवार, अनिल भुजबळ आदि उपस्थित होते.
अनिल उरवणे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत भुजबळ यांनी आभार मानले.


01477