दौंडजजवळ टेंपो लोहमार्गावर उलटला

दौंडजजवळ टेंपो लोहमार्गावर उलटला

वाल्हे, ता. २४ : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर बुधवारी सकाळी दौंडजखिंडजवळील भोरवाडी फाटा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने एक टेम्पो महामार्गापासून ७० मीटर थेट पुणे-मिरज लोहमार्गावर जाऊन उलटला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी अथवा मृत्यू झाला नाही.
भोरवाडी फाट्यापासून पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान एक मालवाहतूक टेम्पो जेजुरीकडून नीरा बाजूकडे भरधाव निघाला होता. चारपदरी रस्ता अचानक एकेरी झाल्याने टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. वेगात असलेल्या टेम्पो थेट रस्त्याच्या डाव्या बाजूने दगड गोठ्यातून महामार्गालगत जवळपास ७० मीटरवर असलेल्या पुणे-मिरज रेल्वे लाइनवर जाऊन पलटी झाला.
अपघातानंतर टेम्पो लोहमार्गाजवळ पडल्याने काही काळ रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या टेंपोमध्ये ब्रिटानिया कंपनीचे बिस्किटचे बॉक्स होते. मोठ्या उंचीवरून हा टेम्पो खाली पडला. सुदैवाने टेम्पो चालक मात्र सुखरूप बाहेर आला. तो किरकोळ जखमी आहे. सचिन सखाराम कारंडे असे चालकाचे नाव असून, तो सहजपूर (ता.हवेली) येथील रहिवासी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com