
पालखी महामार्गावर आढळला मृतदेह
वाल्हे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर पिसुर्टी (ता.परंदर) नजिक पुणे मिरज रेल्वे गेटमध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. धावत्या रेल्वेतून हा व्यक्ती रेल्वे गेटच्या परिसरात पडला आहे. काल सोमवार (ता. २९) रात्री नऊच्या सुमारास हा मृतदेह पालखी मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना दिसून आला.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते वाल्हे दरम्यान असलेल्या पुणे मिरज रेल्वे लोहमार्गावरील २७ नंबर रेल्वेगेटमध्ये सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावरील प्रवाशांना आढळून आला. रेल्वेगेटवरील कर्मचाऱ्यांनी नीरा रेल्वे पोलिस व स्थानिक ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून एक (वय ३५) व्यक्ती खाली पडला. धावत्या रेल्वेमधून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. काही काळ रक्तस्राव झाल्याने तो जागीच मृत झाला.
याघटनेची खबर नीरेचे पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांनी नीरा पोलिस दुरक्षेत्रात दिली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा शर्ट, आत काळे बनियान, शर्टवर पिवळे जँकेट, काळी पँन्ट परिधान केली आहे. नीरा रेल्वे पोलिस व स्थानिक ग्रामीण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवला असल्याचे सांगितले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जेजुरी पोलिसांची संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.