उन्हाच्या चटक्यामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात

उन्हाच्या चटक्यामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात

वाल्हे, ता.३ : जून महिना सुरू झाला तरी उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमान वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे मिळेल तेथे पाणी पिऊन पाळीव जनावरे तहान भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यामुळे जनावरांना ताप, अपचन होणे, प्रकृती खालावणे अशा लाळखुरकत विषाणूंच्या संसर्गाचा धोका बळावला असल्याने नकळत अनेक पशू-पक्ष्यांच्या जिवावर बेततो आहे. यामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाळीव जनावरांसह भटकी जनावरे व पक्षीही त्यास अपवाद राहिले नसून, ते उष्माघाताचे शिकार होत असल्याचे पशुपालकांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. अतिउष्णतेमुळे सध्या पाळीव जनावरांसह वन्य प्राण्यांनाही तापमानाचा फटका बसत आहे. तीव्र उन्हाचे चटके बसू लागताच प्रत्येक जण पाणी अथवा गारवा शोधतो, असे वनराज पवार यांनी सांगितले.
उष्णतेमुळे सध्या जनावरांना मोठ्या प्रमाणावर अतिसाराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. उष्माघाताने शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले असून यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. वन्यप्राणीदेखील बेहाल झाले आहेत. पाळीव प्राण्यांना देखील दिवसभरात चार ते पाच वेळा पाणी दाखवावे लागत आहे.

प्राणी व पक्ष्यांना नैसर्गिक स्त्रोतांमधून आपली गरज भागवावी लागत असल्याने उन्हाळा नकळत अनेक पशु-पक्ष्यांच्या जिवावर बेततो आहे. प्राळीव जनावरांसह भटकी जनावरे व पक्षीही त्यास अपवाद राहिले नसून ते उष्माघाताचे शिकार होत असून गेले चार दिवसांमध्ये जर्सी गाई उष्माघाताने मृत पावले आहेत.
- समीर भुजबळ, शेतकरी

शेतकऱ्यांनी जनावरांना सकाळी लवकर व संध्याकाळी पुरेसा हिरवा चारा, पिण्याचे स्वच्छ थंड पाणी द्यावे व उन्हापासून त्यांचे संरक्षण होईल, अशी व्यवस्था करावी. तसेच उन्हात जनावरे येणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताने जनावरे दगावू नये यासाठी पशुपालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने औषधोपचार मिळविण्यासाठी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवणे आवश्यक आहे.
- डॉ. प्रशांत उटगे, पशुवैद्यकीय अधिकारी
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com