
यवतमध्ये दहा किलो गांजा जप्त
यवत, ता. ४ : पुणे- सोलापूर महामार्गावर यवत पोलिसांनी दहा किलो गांजा जप्त केला असून याप्रकरणात तीनजणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील दोन युवक गांजा विक्रीसाठी निघाल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सापळा लावला. संशयितांना थांबवून चौकशी केल्यावर १० किलो वजनाचा गांजा त्यांच्याजवळ आढळून आला. त्याची किंमत १ लाख ८४ हजार रुपये आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह संदीप मधुकर चव्हाते (वय २७, रा. शास्त्रीनगर, कोथरूड- पुणे) व अक्षय सतीश जाधव (वय २४, रा. साईनाथ वसाहत, शास्त्रीनगर, कोथरूड- पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपी अक्षय जाधव याने सदरचा गांजा समीर चंदुलाल परदेशी (वय ३०, रा. मेनरोड करमाळा, जि. सोलापूर) याचेकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर समीर परदेशी यास अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपींना दौंड न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलिस कोठडी दिलेली आहे. पोलिस निरीक्षक नारायण पवार, ए. एस. काळे , चालक आवाळे, व्ही. व्ही. चोबे, एस. डी. क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00129 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..