शहरातही रूजतेय ‘आठवडे बाजार’ची संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातही रूजतेय ‘आठवडे बाजार’ची संकल्पना
शहरातही रूजतेय ‘आठवडे बाजार’ची संकल्पना

शहरातही रूजतेय ‘आठवडे बाजार’ची संकल्पना

sakal_logo
By

यवत, ता. १४ : आठवडे बाजार ही ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेली जुनी संकल्पना आहे. ग्रामीण भागातील अर्थचक्र प्रामुख्याने बलुतेदारी व नंतर आठवडे बाजार या संकल्पनांवर आधारलेले आहे. बलुतेदारीची पद्धत लोप पावली. मात्र आजही खेड्यांमधील आर्थिक उलाढालीचे मुख्य केंद्र आठवडे बाजारच आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथील महेश फरगडे, गणेश फरगडे व इंदापूर तालुक्यातील पळसदेवच्या उषा काळे या भावंडांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापली. शेतमालाच्या निर्मितीपेक्षा त्याची विक्री हे शेतकऱ्यांपुढील मोठे आवाहन आहे. मध्यस्थांची साखळी ही शेतकऱ्यांच्या खिशाला लागलेली मोठी कात्री आहे. त्यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक असा शेतमालाचा प्रवास झाला तर ग्राहकांना चांगला माल मिळेल आणि शेतकऱ्यांनाही पुरेसे पैसे मिळतील. यासाठी शहरी भागात आठवडे बाजार भरवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे या तरूणांनी ठरवले.
पुरंदर तालुक्यातील नरेंद्र पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सोपस्कार पूर्ण करून सन २०१७ मध्ये शहरी भागात आठवडे बाजार भरवण्याचे नियोजन. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, वैयक्तिक शेतकऱ्यांना एकत्र करून शहरातील नियोजित जागेत आठवडे बाजार भरवण्यास सुरूवात केली. त्यास उत्तम प्रतिसाद मिळू लागला. आज या तरूणांच्या पुढाकाराने पुणे व पिंपरीचिंचवड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सोमवार वगळता आठवड्यातील प्रत्येक दिवशी आठवडे बाजार भरवला जातो. त्याचा शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना चांगला फायदा होत आहे. ही संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या महेश फरगडे व उषा काळे यांचा नुकताच बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. फरगडे

आज कंपनीशी पंचवीस शेतकरी गट, ३ शेतकरी उत्पादक कंपन्या व १३ वैयक्तिक शेतमाल उत्पादन करणारे शेतकरी जोडलेले आहेत. कृषी विभाग, पणन मंडळ व आत्मा यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत असल्याने हे यश मिळत आहे.
महेश फरगडे

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00136 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top