यवत ग्रामस्थ करणार पुलाची डागडुजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवत ग्रामस्थ करणार पुलाची डागडुजी
यवत ग्रामस्थ करणार पुलाची डागडुजी

यवत ग्रामस्थ करणार पुलाची डागडुजी

sakal_logo
By

यवत, ता. ६ ः यवत पाटबंधारे विभागाकडे अनेकदा मागणी करूनही कालव्यावरील पुलाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे कुदळे मळा येथील नवा मुठा उजवा कालव्यावरील पुलाच्या डागडुजीचे काम अखेर ग्रामस्थांनी सुरू केले आहे. सावतामाळी मित्र मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
यवत पाटबंधारे विभागातील कासुर्डी गावच्या हद्दीतील होले वस्ती व भोंडवे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल व यवत गावच्या हद्दीतील दोरगे वस्ती, कुदळे मळा येथील पूल अशा चार पुलांच्या दुरुस्ती व विस्तारीकरणाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. कुदळे मळा येथील पूल रुंद आहे, मात्र तो मोडकळीला आल्याने वापरास धोकादायक बनला आहे. नव्याने आवर्तन सुरू झाल्यावर पाण्याच्या प्रवाहाने पुलाला धोका होणार आहे. पुलाच्या लोखंडी कठड्यांचीही दुरवस्था झाली आहे. शासन वेगवेगळी तांत्रिक कारणे सांगत या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
दरम्यान, या पुलासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर असून या पुलासोबत इतरही पुलांची रुंदी आता पाच मिटर होणार आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र काम काही सुरू होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या पुलाच्या डागडुजीला सुरूवात केली आहे. त्यासाठी स्वप्नील खुटवड या बांधकाम व्यावसायीक तरुणाने वाळू उपलब्ध करून दिली आहे. सावतामाळी मंडळाने इतर वस्तूंसाठी पैसे उपलब्ध केले आहेत.


हा पूल जुना झाला आहे. पाटबंधारे विभागाकडे अनेकदा याबाबत तक्रार केली. मात्र पाटबंधारे विभागाकडून वारंवार तांत्रिक अडचण पुढे केली जात आहे. अखेर आमच्याच कुटुंबीयांच्या जीवासाठी आम्ही तरूणांनी पुढाकार घेऊन डागडुजी सुरू केली आहे.
-सुखदेव कुदळे, अध्यक्ष, सावतामाळी मित्र मंडळ, यवत

हा पूल वापरासाठी धोकादायक झाला आहे. त्याचा वापर करू नये. पर्यायी मार्गाचा वापर करावा असे पाटबंधारे विभागाकडून यवत ग्रामपंचायतीला कळवले आहे. या पुलाची पुनर्बांधणी होणार आहे. तो रुंदही होणार आहे.
- गणेश टेंगले, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग

YAT22B00293

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00158 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top