डाळींबला दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाळींबला दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
डाळींबला दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

डाळींबला दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

sakal_logo
By

यवत, ११ : दौंड, हवेली व पुरंदर तालुक्यांच्या सीमेवर असलेले प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल बन डाळींब (ता. दौंड) येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात लाभो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच सकाळी विठ्ठलाची मिरवणूक काढण्यात आली.

मंदिरासमोर दुपारी एक ते सायंकाळी सहावाजेपर्यंत गावातील ढोल लेझीम पथकांचे नृत्य सादर केले. मंदिराच्या सभामंडपात परिसरातील गावांच्या भजनी मंडळांचे भजन गायन केले. तर रात्री नऊ वाजता धामणे (ता. खेड) येथील काळुबाई कलानाट्य मंडळाने भारूडाचा कार्यक्रम झाला. त्यास भाविकांचा प्रतिसाद लाभला.
दरम्यान, विठ्ठलाची पहाटेची महापूजा पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात उपस्थीत होते. यावेळी तीनही तालुक्यातील राजकीय सामाजीक क्षेत्रातील मान्यवर येथे हजेरी लावली होती.

मंदिरात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, पंचायत समीतीचे माजी उपसभापती नितीन दोरगे, सुशांत दरेकर, महादेव यादव, हेमलता बडेकर, डाळींबच्या सरपंच वनिता धिवार प्रामुख्याने उपस्थीत होत्या. देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी प्रास्ताविक केले. सचिव एल. बी. म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले.

आमदारांना पूजेचा मान
श्री विठ्ठल बन येथे एकादशी दिवशी यापुर्वी खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते पूजा केली आहे. मात्र पुरंदर, हवेली आणि दौंड येथे नव्याने होणाऱ्या आमदारांना पूजेचा मान देण्याची परंपरा आहे. यापुर्वी आमदार अशोक पवार (शिरूर- हवेली), अशोक टेकवडे, विजय शिवतारे (पुरंदर- हवेली), रमेश थोरात (दौंड), राहुल कुल (दौंड) आणि आता आमदार संजय जगताप (पुरंदर- हवेली) यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आहे.

00298

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00160 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top