चराऊ जमिनीवर दरवळतोय फुलांचा सुगंध तरुण फुलोत्पादकांची आधुनिक शेतीला पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चराऊ जमिनीवर दरवळतोय फुलांचा सुगंध
तरुण फुलोत्पादकांची आधुनिक शेतीला पसंती
चराऊ जमिनीवर दरवळतोय फुलांचा सुगंध तरुण फुलोत्पादकांची आधुनिक शेतीला पसंती

चराऊ जमिनीवर दरवळतोय फुलांचा सुगंध तरुण फुलोत्पादकांची आधुनिक शेतीला पसंती

sakal_logo
By

यवत, ता. २५ : यवत परिसरात निशिगंध व शेवंती वर्गीय फुलांच्या विविध जातींच्या फुलांचे उत्पादन मागील तीन पिढ्यांपासून घेतले जात आहे. पण आता
तरुण फुलउत्पादक आधुनिक पद्धतीने फूल शेतीकडे वळू लागला आहे. बाजारभावाचा अंदाज घेत चराऊ जमिनीवर पारंपरिक फुलांसोबत जरबेरा, मोगरा, गुलाब, अष्टर बहरल्याने फुलांचा सुगंध आता दरवळू लागला आहे.

भुलेश्वर डोंगर पायथ्या लगत मोठ्या प्रमाणात मेंढपाळांच्या चराऊ जमिनी होत्या. या कुटुंबांतील तरुणांनी मेंढीपालनाचे लक्ष तरकारी व फूल उत्पादक शेतीकडे वळवले आहे. त्यामुळे फूल उत्पादक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधुनिक पद्धत, ठिबक सिंचन व मल्चिंग पेपर वापर करून हे तरुण प्रयोगशील आहेत. त्यामुळे सध्या फूल शेती आता नव्याने बहरली आहे.

फुलशेतीच्या भविष्यासाठी ही चांगली बाब आहे. त्यामुळे कमी मनुष्य बळात अधिक फुलोत्पादन घेण्याकडे कल वाढू लागला आहे. यवत परिसरातील भरतगाव, बोरीऐंदी, डाळिंब, कासुर्डी, भांडगाव, खोर व घाटावरील पुरंदर तालुक्यातील माळशिरस, टेकवडी, पोंढे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फूल उत्पादनाकडे तरुण शेतकरी वळल्याचे दिसत आहे. या तरुणांनी टप्प्या टप्प्यांने आधुनिकता या शेती पद्धतीत आणण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भविष्यात रोजगार व अर्थप्राप्तीच्या दृष्टीने फुलोत्पादन क्षेत्रात मोठी संधी दिसत आहे.


वाढलेल्या आर्थिक उत्पन्नामुळे क्रांती
यवत हे खऱ्या अर्थाने फुलांचे गाव आहे. सुरुवातीला ठराविक क्षेत्रात व पारंपरिक पद्धतीने होत असलेल्या शेती क्षेत्रात आता फुलशेतीची मोठी वाढ झाली आहे. फुलशेती करण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग पेपर, लागवडीची पट्टा पद्धत, कुचकामी ठरलेले वाण बदलून परराज्यातील (तामिळनाडू, कर्नाटक) वाणांची यशस्वी लागवड, नव्या वाणांमुळे वाढलेले हंगाम व त्यातून मिळालेले चांगले आर्थिक उत्पन्न हे फूल शेती क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल.


यवत परिसरातील विविध प्रकारची दर्जेदार फुले पिकवली जातात. मोठ्या शेतकऱ्यांसोबत अनेक लहान शेतकरीही आहेत. या सर्वांना आपली फुले रोजच्या रोज पुणे येथील मार्केट यार्डला न्यावी लागतात. पुण्याच्या मार्केट यार्डात गर्दी कमी कशी करावी याचा प्रशासन सध्या विचार करत आहेत. याचाच एक भाग म्हणून फुलांचे मार्केट यवत येथील कृषी उत्पादन बाजार समितीच्या जागेत उभारले तर ते शेतकऱ्यांना सोयीचे व प्रोत्साहित करणारे ठरणार आहे.
- रामभाऊ चौधरी, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड


00319

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00169 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..