आरोग्य केंद्र इमारतीचे कासुर्डी येथे उद्‌घाटन आरोग्य केंद्र इमारतीचे कासुर्डी येथे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य केंद्र इमारतीचे कासुर्डी येथे उद्‌घाटन
आरोग्य केंद्र इमारतीचे कासुर्डी येथे उद्‌घाटन
आरोग्य केंद्र इमारतीचे कासुर्डी येथे उद्‌घाटन आरोग्य केंद्र इमारतीचे कासुर्डी येथे उद्‌घाटन

आरोग्य केंद्र इमारतीचे कासुर्डी येथे उद्‌घाटन आरोग्य केंद्र इमारतीचे कासुर्डी येथे उद्‌घाटन

sakal_logo
By

यवत, ता.६ : कासुर्डी (ता.दौंड) येथे नागरिकांसाठी सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय ग्रामीण आरोग्य केंद्राच्या मदतीने २४ तास आरोग्य सेवा देण्याचा मानस आहे, असे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक रजत दत्ता यांनी सांगितले. येथील ग्रामीण आरोग्य केंद्राच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी सरपंच व उद्योजक शशिकांत आखाडे यांनी त्याचे वडील कै.तुकाराम आखाडे यांच्या स्मरणार्थ ग्रामीण आरोग्य केंद्राची इमारत बांधून दिली होती. त्यानंतर आता इमारतीचे नूतनीकरण सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालयाच्या वतीने केले आहे. सद्य परिस्थितीत आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात येते. ही प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल या वेळी उपस्थित होते.
यावेळी कासुर्डी गावच्या सरपंच धनश्री विशाल टेकवडे, उपसरपंच दिलीप हरिभाऊ आखाडे, सशस्त्र सेना महाविद्यालयाचे लेफ्टनंट जनरल रामा सेथू, डॉ. अरविंद, ब्रिगेडीअर एस.के.कौशिक, एअर व्हाइस मार्शल राजेश वैद्य, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, सिव्हिल सर्जन डॉ.अशोक नांदापूरकर, यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, दौलत ठोंबरे, बाळासाहेब टेकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

00342

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00180 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..