स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा यवत परिसरात उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा 
यवत परिसरात उत्साह
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा यवत परिसरात उत्साह

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा यवत परिसरात उत्साह

sakal_logo
By

यवत, ता. १६ ः यवत येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यवत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. विद्या विकास मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ या शाळांनी संयुक्तपणे त्यात भाग घेतला.

विद्या विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीत सहभाग घेतला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मैदानावर या तीनही शाळांचे ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे व सरपंच समीर दोरगे यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, व १ व विद्या विकास मंदिर विद्यालय येथे ध्वजवंदन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात परीसरातील माजी सैनिक, पत्रकार, गुणवंत विद्यार्थी, शाळेला मदत करणारे माजी विद्यार्थी, विशेष कार्य केलेले नागरीक, यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तीनही शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. ग्रामपंचायतच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, भारिप बहुजन महासंघाचे उत्तम गायकवाड, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दत्तात्रेय डाडर यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाचे प्राचार्य दादा मासाळ व जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्य़ापक रामभाऊ दोरगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले. उपशिक्षक रविंद्र भगत व मनिषा कांबळे यांनी सुत्रसंचालन केले, तर पर्यवेक्षिका मंगल कुदळे यांनी आभार मानले.
---------------------------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00191 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..