भरतगाव, बोरीऐंदीत ''लंपी''चा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरतगाव, बोरीऐंदीत ''लंपी''चा धोका
भरतगाव, बोरीऐंदीत ''लंपी''चा धोका

भरतगाव, बोरीऐंदीत ''लंपी''चा धोका

sakal_logo
By

यवत, ता.१० : भरतगाव व बोरीऐंदी (ता. दौंड) गावांतील परिसरात जनावरांमध्ये ''लंपी'' या संसर्गजन्य आजाराच्या लक्षणांमध्ये वाढ झाली आहे. जनावरांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन गावांना बाधित निगराणी क्षेत्र घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून परिसरातील जनावरांचे ''गोट पॉक्स'' लसीकरण सुरू करण्यात आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. अजित पवार यांनी दिली.

भरतगाव येथील जगदाळे वस्ती येथील दादासाहेब जगदाळे व बोरीऐंदी येथील दत्तात्रेय यादव यांच्या जर्सी गायींना लंपी रोगाची लक्षणे दिसून आली आहेत. भरतगावमधील इतरही शेतकऱ्यांच्या जनावरांमध्ये ही लक्षणे आहेत मात्र अंगावरील फोड हे डास चावल्याने आले आहेत, असे समजून शेतकरी दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. मात्र शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित पशुवैद्यांशी संपर्क साधन्याचे आवाहन केले जात आहे.

अशी आहेत लंपी रोपाची लक्षणे
१. जनावरांच्या अंगावर फोड येणे,
२. फोडांतून स्त्राव स्त्रवणे, पायाला सूज
३. अशक्तपणा वाढणे, ताप येणे,
४. गाभण जनावरांचा अवेळी गर्भ पडणे


असा होतो संसर्ग
बाधित जनावरांच्या अंगावरील फोडातून स्त्राव येत असेल आणि यावर डास, माशी, गोची़ड किंवा अन्य किटक बसले व हेच किटक इतर जणावरांना चावले तर हा संसर्ग होऊ शकतो.

अशी घ्या काळजी
१. जनावरांचे विलगीकरण करावे
२. जनावरांना डास, माशा, गोचीड आदींपासून ठेवा
३. जनावरांजवळ धुरळणी, फवारणी करणे
४. रोगप्रतिकारक शक्तीसाठी ताजा व हिरवा चारा द्यावा
५. पशुवैद्यांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे


जनावरांमध्ये लंपीचा संसर्ग वाढू नये. यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. लक्षणे आढळलेल्या बोरीऐंदी व भरतगाव या दोन्ही गावांमध्ये सरकारी कर्मचारी व खासगी पशुवैद्य यांच्या मदतीने लसीकरण सुरू आहे. गरजेप्रमाणे लसींची मागणी केली जाते. शासनाकडून त्या उपलब्ध करून दिल्या जात आहे.
- डॉ. अजित पवार, पशुधन विकास अधिकारी

00402

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00210 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..