उंडवडी येथे विकासकामांचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंडवडी येथे विकासकामांचे भूमिपूजन
उंडवडी येथे विकासकामांचे भूमिपूजन

उंडवडी येथे विकासकामांचे भूमिपूजन

sakal_logo
By

यवत, ता.११ : उंडवडी (ता. दौंड) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‍घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आला. नळ पाणीपुरवठा योजना, उंडवडी सौंदडवाडी बंदिस्त गटर आदी कामांचे भूमिपूजन तर ग्रामपंचायत उंडवडी बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (भोसलेवाडी) इमारत, प्राथमिक शाळा (उंडवडी) इमारत, उंडवडी गावठाण जलशुद्धीकरण, भोसलेवाडी स्मशानभूमी सुशोभीकरण, पोलिस पाटील कार्यालय या कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी व्यावसायिक विशाल भोसले, श्‍यामराव दोरगे, भीमा सहकारी साखर कारखाना संचालक माणिक कांबळे, राहूचे सरपंच दिलीप देशमुख, यवतचे उपसरपंच सुभाष यादव, भाजप नेते तानाजी दिवेकर, उंडवडीच्या सरपंच दीपमाला सतीश जाधव, उपसरपंच विकास सुभाष कांबळे, सदस्या मैना गुंड, विमल जाधव, सुनील नवले, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गडदे यांनी केले, उपसरपंच विकास कांबळे यांनी केले आभार मानले.
-------------
00409

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00213 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..