कासुर्डी तलाव भरल्याने शाश्‍वत पाणी उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासुर्डी तलाव भरल्याने शाश्‍वत पाणी उपलब्ध
कासुर्डी तलाव भरल्याने शाश्‍वत पाणी उपलब्ध

कासुर्डी तलाव भरल्याने शाश्‍वत पाणी उपलब्ध

sakal_logo
By

यवत, ता. १२ : ग्रामपंचायतच्या वृक्षारोपणापासून वाळूमाफियांच्या वाळू उत्खननापर्यंत आणि गाळपड जमिनींच्या वादापासून पर्यंटन स्थळ विकासापर्यंत मागील काही काळात सातत्याने चर्चेत असलेला कासुर्डी तलाव आता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला दौंड तालुक्यास हा तलाव भरल्यामुळे शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले आहे.

दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील या तलावाचे पाणलोट क्षेत्र आणि साठवणक्षमताही सर्वात मोठी आहे. तालुक्यातील बहुतांश तलाव जनाई शिरसाई, नवा मुठा उजवा कालवा, पुरंदर उपसा सिंचनचा कुपटेवाडी फाटा यांच्या माध्यमातून कधीना कधी भरले जातात. मात्र कासुर्डी तलाव उपसा सिंचनने भरण्याचा कोणी कधी प्रयत्नच केला नाही. कुपटेवाडी फाट्याने हा तलाव भरणे शक्य आहे. मात्र मोठी साठवण क्षमता असल्याने तसा विचार कधी शेतकऱ्यांनी केला नाही. लॉकडाउन पूर्वी सुशोभीकरण, खोलीकरण, शेतीसाठी गाळ उपसा अशा विविध नावांखाली या तलावातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला आहे. त्यामुळे या तालावाची साठवण क्षमता बऱ्याच अंशी वाढलीही आहे. या तलावातून पाण्याचा प्रत्यक्ष उपसा होत नाही, त्यास पाझरही फारच कमी आहे. मात्र तलावाभोवती असलेल्या विहिरींच्या पाणी पातळी टिकवून ठेवण्यास या तलावाचा चांगला उपयोग होतो. तसेच उन्हाळ्यात अनेक परदेशी पक्षीही या तलावाच्या परिसरात वास्तव्याला असतात.

कासुर्डी तलाव एकदा भरला की दोन तीन वर्षे येथील पाणी आटत नाही. त्याचा विहिरी व कूपनलिकांना चांगला फायदा होतो. शाश्‍वत पाण्यामुळे देशी विदेशी पक्षीही येथे येत असतात. दोन तीन वर्षांनंतर तलावाच्या सांडव्यातून पाणी पडताना पाहून कासुर्डी, भरतगाव व परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
-प्रवीण इंगळे, ग्रामपंचायत सदस्य, भरतगाव

00413

Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00215 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..