यवतच्या येथे मोफत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवतच्या येथे मोफत आरोग्य शिबिर
यवतच्या येथे मोफत आरोग्य शिबिर

यवतच्या येथे मोफत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

यवत ता. ८ : यवत येथील ग्रामीण रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच रक्त, लघवी तपासणी, एक्सरे, ईसीजी, हाडांची ठिसूळता तपासणी, किशोरवयीन मुलामुलींच्या समस्या तपासणी, अशा विविध तपासण्या केल्या जाणार आहेत.
तपासणी दरम्यान रुग्णास शस्त्रक्रियेची गरज असल्यास त्याबाबतची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी नुकतीच दिली आहे.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. भगवान पवार, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, अजिंक्य येळे, निर्मला राशीनकर, डॉ. संग्राम डांगे, डॉ. उज्वला जाधव, समिर दोरगे उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. इरवाडकर यांनी दिली. जास्तीत जास्त नागरीकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.