यवतला छबीना रावण दहणामुळे रंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवतला छबीना रावण दहणामुळे रंगत
यवतला छबीना रावण दहणामुळे रंगत

यवतला छबीना रावण दहणामुळे रंगत

sakal_logo
By

यवत, ता. ६ : यवत (ता. दौंड) येथे छबीना व रावण दहणाचा कार्यक्रमाने दसरा सणामध्ये रंगत आली. मागील दोन वर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे ज्येष्ठांसह तरुणांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साह असल्याचे चित्र दिसून आले.
सर्व ग्रामस्थ, मानकरी, पारंपरिक वादक, पोतराज, गोंधळी यांच्या सहभागाने ग्रामदैवताच्या पालखीचा छबीना मोठ्या उत्साहात निघत असतो. म्हसोबा चौकातून सुरू झालेला हा छबीना कळकाईमाता, काळभैरवनाथ, तुकाई, बडे शाहवाली दर्गा अशा विविध ठिकाणी आरती करत महालक्ष्मी मंदिर येथे मुख्य आरतीसाठी आला. या ठिकाणच्या आरतीनंतर येथे रावणाच्या भव्य पुकळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे छबिन्याची सांगता झाली. मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाहण्यात आला.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शेळके, गणेश कदम, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, नानासाहेब दोरगे, सदानंद दोरगे, सुभाष यादव, रमेश यादव, दिलीप यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तुकाई मंदिराचे ट्रस्टी विनायक अवचट यांनी छबिन्याचे स्वागत केले.
दरम्यान, पालखी छबीना तुकाई मंदिराकडे जाताना त्यास धोकादायकपणे महामार्ग ओलांडावा लागतो. या समस्येकडे ग्रामपंचायतीसह प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी ''सकाळ''शी बोलताना मत व्यक्त केले.

हिंदू- मुस्लीम ऐक्याचे परिसरात कौतुक
तुकाई मंदिरालगत असलेल्या बडे शाहवाली दर्गा येथे पारंपरिक सीमोलंघणाचे ठिकाण आहे. हे ठिकाण दर्ग्याच्या कुंपनच्या आता असल्याने दर वर्षी सीमोल्लंघनासाठी पालखी याच ठिकाणी येते. येथे आरती झाल्यानंतर एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या पद्धतीचे हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून परिसरात कौतुक होत असते.


00458