देऊळगाव गाडासाठी दहा कोटींची पाणी योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देऊळगाव गाडासाठी
दहा कोटींची पाणी योजना
देऊळगाव गाडासाठी दहा कोटींची पाणी योजना

देऊळगाव गाडासाठी दहा कोटींची पाणी योजना

sakal_logo
By

यवत ता. २१ ः देऊळगाव गाडा (ता. दौंड) गावासाठी दहा कोटी २१ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे, अशी माहिती सरपंच वैशाली बारवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ही योजना मंजूर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देऊळगाव गाडा हे गाव दौंड तालुक्याच्या दुष्काळी पट्यातील गाव आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना या गावाला करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन सरपंच वैशाली बारवकर व सदस्य अक्षय बारवकर यांनी माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांच्यामार्फत खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर हा प्रश्न मांडण्यात आला. खासदार सुळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि आमच्या गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी दहा कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, असे सरपंच वैशाली बारवकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आमच्या गावासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला असल्याचेही बारवकर यांचे म्हणणे आहे.
ही योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यावर देऊळगाव गाडा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचे सरपंच बारवकर यांनी सांगितले.