शेतकऱ्यांचा मुलगा बनला राज्य कर निरीक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांचा मुलगा बनला राज्य कर निरीक्षक
शेतकऱ्यांचा मुलगा बनला राज्य कर निरीक्षक

शेतकऱ्यांचा मुलगा बनला राज्य कर निरीक्षक

sakal_logo
By

यवत ता. २४ : खामगाव (ता. दौंड) प्रगतशील शेतकरी जयसिंगराव भालसिंग यांचा मुलगा अक्षय याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य कर निरीक्षकपदी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. खामगाव च्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये अक्षय ने माध्यमिक शिक्षण घेतले. तो बोर्ड परीक्षेत शाळेत पहिला आला होता. हीच गुणवत्ता जपत अक्षयने मॅकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदविका व पदवी चांगल्या गुणांनी मिळवली. स्पर्धा परीक्षेचा अनुभव पदरी असावा म्हणून त्याने परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यशही मिळवले.
अक्षयच्या या यशाचे त्यांच्या शाळा, कॉलेज, गाव व मित्रपरिवाराकडून कौतुक होत आहे.
00526