अज्ञात वाहनाच्या धडकेत  
यवत येथे बिबट्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत यवत येथे बिबट्याचा मृत्यू

यवत, ता. १८ : यवत (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर नर जातीचा बिबट्या अज्ञात वाहनाची धडक बसून जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान यवत येथील नाईक बागेसमोर घडली.
यवत परिसरात मागील दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. या परिसरातील काही मजुरांनी बिबट्याला पाहिल्याने ते काम सोडून निघून गेले होते. त्यामुळे या भागात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केलेली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सचिन पुरी हे घटनास्थळी हजर झाले. बिबट्याचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळतात घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लडकतवाडी येथे शेतीच्या बांधावर लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता यवत येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com