उत्पादकांचा वखारीत कांदा साठवण्याकडे कड

उत्पादकांचा वखारीत कांदा साठवण्याकडे कड

यवत, ता.२४ ः यवत (ता. दौंड) वाढता उन्हाळा, विजेचा लपंडाव अशा आसमानी सुलतानी संकटांचा सामना करत पिकविलेला कांदा सध्या चांगला बाजारभाव नसल्याने वखारीत साठवण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. आता बाजारात नेला तर उत्पादन खर्चही निघत नाही. वाखारीत साठवला तरी वाढत्या तापमानात तो किती तग धरतोय हा प्रश्न आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
भुलेश्वर पायथा परिसरातील डाळिंब, बोरीऐंदी, भरतगाव, यवत, भांडगाव या गावच्या हद्दीतील शेतकरी फुलांसोबत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. कांद्याला सध्या अपेक्षित बाजारभाव नसल्याने येथील शेतकरी वाढत्या तापमानाचा विचार न करता कांदा वखारीत साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खरे तर मोठा जुगार आहे. आता कांदा विकावा तर आठ ते दहा रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. श्रावण महिना, दिवाळी या काळापर्यंत जर साठवणूक नीट झाली तर चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.


पुढील पाच सहा महिन्यांत बाजारभाव वाढण्याची आशा
हजारो रुपयांचे बियाणे, मेहनत, खते व किटक नाशकांचा खर्च, विजेचा लपंडाव अशा अनेक अडचणींवर मात करत चांगल्या दर्जाचे उत्पादन घेऊनही त्यास चांगला भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे सारे कष्ट मातीमोल होतात. त्यांच्या मनातील आशा त्यांना शांत बसू देत नाही. बराच काळ उन्हात वाळवलेला हा कांदा अद्यापही भाव मिळत नसल्याने तो वखारीत साठवण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पुढील पाच सहा महिन्यांत बाजारभाव वाढताच हा कांदा विक्रीला काढला जाणार आहे.


कांदा काढणी नंतर त्यास पुरेसा न वाळवताच तो वखारीत भरला तर तो खराब होण्याचे प्रमाण वाढते. मात्र त्यास वावरातच पवळ टाकान पाथवानाने झाकून चांगला वाळून दिला. त्यानंतर तो वखारीत भरला तर असा कांदा चार- सहा महिने चांगला राहू शकतो. आम्ही आता वखारीत भरलेला कांदा दिवाळी पर्यंत ठेवण्याच्या हिशोबाने साठवत आहोत.
- सावळाराम हाके, शेतकरी भरतगाव (ता. दौंड)

--------------------------------
00767

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com