देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग झाला सुरक्षित

देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग झाला सुरक्षित

किवळे, ता. १९ : देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे हद्दीत गेल्या काही महिन्यांत सेवा रस्ते, आवश्यक तिथे दुभाजक आणि बसथांबे या सुविधा पुरविल्याने हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित झाला आहे.

नॅशनल हायवे ॲथॉरिटी अंतर्गत रिलायन्समार्फत हे काम करण्यात आले. बाह्यवळण मार्ग सुरू होत असलेल्या देहूरोड येथील सेंट्रल ते किवळे येथील द्रुतगती एक्झिट पूल दरम्यान बंगळुरू बाजूकडे (मामुर्डी हद्दीत) थॉमस कॉलनीनजीक आणि पुढे शितळानगर- २ मध्ये बसथांब्याची उभारणी केली आहे. या मार्गावर कात्रज- तळेगाव बस धावते. थांब्यासमोर सेवा रस्त्यावर दुभाजक केल्याने प्रवाशांच्या दृष्टीने बसमध्ये चढ- उतार करणे सुरक्षित झाले आहे.

या महामार्गावर उत्तमनगरनजिक दुभाजक, शितळानगर स्मशानभूमी ते मामुर्डी पूल दरम्यान सेवा रस्ता आणि दुभाजक करण्यात आला. त्यामुळे स्थानिक वाहन चालकांच्या दृष्टीने वळण घेताना वाहतूक अधिक सुरक्षित झाली आहे.
परिसरात गृहनिर्माण सोसायट्या वाढल्याने सकाळी, संध्याकाळी पादचारी फिरण्यास बाहेर पडतात. शुद्ध हवेच्या दृष्टीने या मार्गावर वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी दीपक भवार, दादा तरस, रोहिदास तरस, रोहिदास दांगट, रूपेश यादव, राजेश दांगट, सुरेश लुनावत यांनी केली आहे.
------------------------
किवळे ः देहूरोड- कात्रज बाह्यवळण किवळे हद्दीत उभारण्यात आलेला बसथांबा, सेवा रस्त्यावरील दुभाजक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com